वाहन चोरी प्रकरणी एकास अटक, 15 लाख रुपयांची वाहने जप्त
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर शहरातील वाहनांची चोरी प्रकरणी एकास अटक करून त्यांच्याकडून रु 15 लाख किंमतीची तीन कार जप्त करण्यात आली आहेत
यासीन मोहम्मद हुसेन सरदार पटेल (वय २४, रा. इब्राहिमपूर, रा. शहरातील रेल्वे स्थानकाजवळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश भगवान सोनवणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. बुधवारी सकाळी सिंदगी नाका येथे पथक गस्त घालत असताना अटक करण्यात आलेला आरोपी नंबर प्लेट नसलेल्या बोलेरोमधून जात होता. तपास पथकाची नजर त्याच्यावर पडताच तो वाहन वळवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्या पथकाने त्याच्या वाहनाचा पाठलाग करुन आरोपीकडे चौकशी केली असता त्याने वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
नंतर त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता, आता पकडलेली बोलेरो त्यानेच चोरली होती आणि दीड महिन्यापूर्वी सिंदगी नाका येथे पार्क केलेली बोलेरो त्याने चोरल्याचे स्पष्ट झाले
त्यांनी इतर दोन वाहने चोरून घरासमोर उभी केल्याची माहिती मिळाली असे जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश भगवान सोनवणे यांनी सांगितले. महिंद्रा TUV-300 आणि स्विफ्ट डिझायर वाहन जप्त करण्यात आली आहेत
यापैकी एक वाहन गोलगुमट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तर, दुसरे वाहन जलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि स्विफ्ट डिझायर वाहन चोरीला गेले होते. ती तिन्ही वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिली.