दोन सरकारी बसमध्ये झालेल्या अपघात 40 पेक्षा जास्त जण जखमी
विजयपूर/ प्रतिनिधी दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील
चडचण शहराजवळ दोन बसमध्ये मागून धडकेत झालेल्या अपघातात ४० पेक्षा जास्त प्रवासीसह काही विद्यार्थी जखमी झाले आहेत
मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही
सोमवारी सकाळी इंडीहून हलसंगी बतगुनकी मार्गे चडचाणकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एक बस समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या शालेय वाहनाने आदळल्याने होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावला. मात्र त्याच रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या सरकारी बसच्या चालकाने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मागून येणाऱ्या बसने समोरील बसला धडकली.
KA-28 F-1727 आणि KA-28 F-1766 क्रमांकाच्या सरकारी बसमध्ये झालेल्या धडकेमुळे दोन्ही बसेसचे काही भागाचे नुकसान झाले असून दोन्ही बसमधील मिळून 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत चडचाण शहरात परीक्षेसाठी जाण्यारा महाविद्यालयीन विद्यार्थ्याची संख्या अधिक आहे. काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले, तर आठ ते दहा प्रवाशांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
याप्रकरणीची नोंद चडचाण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.