Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना तर बॅकेत चोरी प्रकरणी तिघांनाअटक

Responsive Ad Here

 

दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना तर बॅकेत चोरी प्रकरणी तिघांनाअटक



विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील सिंदगी पोलिसांनी मोठी कारवाई करून दोन वेगवेगळ्या प्रकरणात चार दुचाकी चोरांना आणि  बँकेत चोरी प्रकरणी तिघांनाअटक केली आहे . दुचाकींच्या चोरीप्रकरणी सिंदगी पोलिसांनी चार  चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 37 दुचाकी जप्त केल्या आहेत.  यांची एकूण किंमत रु.  16.65 लाखांचा अंदाज आहे. सिंदगी नगर आणि पोलीस स्टेशन परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, विजयपूरचे जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे, अतिरिक्त एसपी रामा गौडा ए हत्ती आणि शंकर मारिहाळ,  डीवायएसपी जगदीश एच.  एस.  यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय नानागौडा आर.  पोलीस पाटील व सिंदगीचे पीएसआय भीमप्पा एम.  रबकवी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पथकाने मोठी कारवाई केली आहे.    सिंदगी शहरातील  बायपास रोडवर नंबरप्लेट नसलेल्या दोन मोटारसायकलींना अडवले.  त्या दुचाकीवरील चौघांची चौकशी केली असता त्यांनी ते  यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर येथील बसवराज भीमन्ना हुनसिगीदादा (३१), हुलुगप्पा मारेप्पा कुकलोर (२२), कोंडय्या भीमराया पार्वतीदोड्डी (२२), रविकुमार देविंद्रप्पा पार्वतीदोड्डी असल्याचे सांगितले.   त्यांनी  कलबुर्गी, यादगिरी आणि विजयपुर जिल्ह्यात दुचाकी चोरल्याची कबुली दिली   सिंदगी पोलिसांनी कसून तपास करून बँकेत व इतर ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकींचे हँड लॉक तोडून मोटारसायकली चोरल्याबाबत तोंड उघडले. 

विजयपूर जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी पत्रकार परिषद ही माहिती दिली 



 बँक आणि वित्तीय संस्थेत चोरी प्रकरणी तिघांनाअटक 

पोलिसांनी सिंदगी शहरातील विविध बँक आणि वित्तीय संस्थेत चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.  10 रोजी सायंकाळी 4 वाजता सिंदगी-आलमेल रस्त्यावर डॉल्फिन ढाब्याजवळ पोलिसांनी वाहनांची तपासणी करून तीन आरोपींना संशयास्पद स्थितीत अटक केली.  या आरोपींची चौकशी केली असता तिघांनी सिंदगी शहरातील अन्नपूर्णा फायनान्स आणि एल अँड टी फायनान्स आणि इंडी शहरातील पीकेपीएस बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले.बसवराज लक्ष्मण मदार (28) याला अटक करून रु.  2.20 लाखांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली कार  जप्त केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या सिंदगी पोलिसांना बक्षीस जाहीर केले आहे