वार्तालाप’ माध्यम परिषदसाठी पत्रकार प्रशांत चव्हाण यांची निवड
संपादकीय विशेष-
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्यावतीने रत्नागिरी येथे निमंत्रित पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’ या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदसाठी पत्रकार प्रशांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारची धोरणे आणि त्याच्याशी निगडीत विविध योजनांची माहिती या विषयांवर चर्चा आणि पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमे यांच्यातील परस्पर संवाद वाढवणे हा या वार्तालाप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 'कोकण विभागासाठी समग्र आणि शाश्वत विकास 'या विषयावर आयोजित या कार्यशाळेत भारतीय तटरक्षक दल, केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि कोकण रेल्वे यांचे प्रतिनिधी सहभागींशी संवाद साधणार असून पत्र सूचना कार्यालय (महाराष्ट्र आणि गोवा) च्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती स्मिता वत्स शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी हॉटेल सिल्व्हर स्वान, रत्नागिरी येथे ही परिषद होणार आहे.