Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शिवाजी नगर तांडा दुधनी येथे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

Responsive Ad Here

 शिवाजी नगर तांडा दुधनी येथे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी 



दुधनी प्रतिनिधी - संतोष पोतदार 

          दुधनी येथील श्री सेवालाल तरुण मंडळ शिवाजी नगर तांडा दुधनी यांच्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली . मिरवणूकीत पुरुषासह पारंपारीक वेशभूशेत महीला सहभागी झाल्या होत्या .

          गुरुवारी सकाळी शिवाजी नगर तांड्यातील श्री सेवालाल व जगदंबा मंदीरात पुजारी भिल्लु चव्हाण , नायक , कारभारी , जेष्ठ , संस्थापक अध्यक्ष , अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या समवेत भोग लावण्यात आले . त्यानंतर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आले . दुपारी दोन वाजता सेवालाल तरुण मंडळाच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली दुधनी शिवाजी नगर तांडा ते दुधनी गावाच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली . सायंकाळी चार वाजता संत श्री सेवालाल महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार हार घालून जेष्ठ शंकर राठोड , नायक हरीचंद्र राठोड , कारभारी लालू पवार , अशोक राठोड यांनी अभिवादन केल्यानंतर मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आले . यावेळी महिला व बंजारा बांधवानी एकच जल्लोष केला . संत श्री सेवालाल महाराज की जय या जयघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते . या मिरवणूकीत बंजारा महिला व पुरुष पारंपारीक पोषाखात सहभागी झाले होते .

            यावेळी अध्यक्ष बंटी पवार , उपाध्यक्ष अनिल राठोड , सचिव सुनिल चव्हाण , खजिनदार अप्पाराव राठोड , मिरवणूक प्रमुख गुरू राठोड , आकाश राठोड , पोलीस दिलीप राठोड , मुकींद राठोड , सुनिल राठोड , महेश चव्हाण , राहुल पवार , भानुदास राठोड , प्रदिप राठोड , सागर पवार , गुंडू राठोड , गोरख राठोड , भारत पवार , रोहन राठोड , राजू पवार , शिवाजी चव्हाण , अंबादास राठोड , संजय राठोड हिरु राठोड , गोंविद राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीक्षम घेतले . शेवटी पोमू राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानले .

दुपारी चार वाजता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी धावती भेट घेऊन संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहारघालून अभिवादन केले . व मिरवणूकीत सहभागी झालेल्या बंजारा महिला समवेत फोटो काढून घेतले .