Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

म्हेत्रे प्रशालेत बालसभा कार्यक्रम साजरा

Responsive Ad Here

 म्हेत्रे प्रशालेत बालसभा कार्यक्रम साजरा



दुधनी प्रतिनिधी - बसवराज बंद्राड

 मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथे इयत्ता सहावी विद्यार्थ्यांकडून 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिवस व 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त बालसभा आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष इ. 6 वी वर्गातील कुमारी श्रावणी गणेश ओनमशेट्टी होती. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कर्ते वि. वा. शिरवाडकर व नोबेल पुरस्कर्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. यानंतर इयत्ता सहावी विद्यार्थ्याकडून तसेच अन्य वर्गातील विद्यार्थ्याकडून महाराष्ट्रीय संस्कृती जपत महाराष्ट्रीय वेशभूषा परिधान करून भाषण, गायन, नृत्य, भारुड अशा विविध कलेच्या माध्यमातून हा दिवस अतिउत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे व कॉलेजचे प्राचार्य  श्री. हिरतोट , कॉलेजचे उपप्राचार्य श्री. देसाई , शाळा व कॉलेजचे सर्व शिक्षक - शिक्षिका वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानंतर शिक्षक मनोगतात प्रा. श्री. गद्दी  आणि प्राचार्य श्री. हिरतोट  यांनी भाषा व विज्ञान संदर्भात मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सहावी वर्गशिक्षक श्री. हुळळी , श्री. माळी , श्री. अडवितोटे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विदयार्थी कुमारी मधुश्री कलशेट्टी व कुमार  खादिरबाशा माशाळ यांनी केले तर आभार प्रा.  बिराजदार सरांनी केले.