जि प प्राथमिक मराठी शाळा,वर्ग खोली क्रं २ वर अनधिकृत कब्जा;अशासकीय कामासाठी वापर
सध्या या जागेत,कै मोतीरामजी राठोड सार्वजनिक वाचनालय
उतारा मात्र जि प प्रा शाळेच्या नावे ; जेऊरवाडी येथील धक्कादायक प्रकार,सखोल चौकशी ची मागणी
अक्कलकोट प्रतिनिधी- विश्वनाथ राठोड
ता अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची मालमत्ता क्रमांक २मध्ये दोन वर्ग खोल्या आहेत, त्यामध्ये वर्ग खोली क्रं २ वर जेऊरवाडी येथील कै मोतीरामजी राठोड सार्वजनिक वाचनालयासाठी देविदास मोतीराम राठोड याने स्वतःच्या सोयीकरिता अशासकीय कामासाठी बेकायदेशीर अनधिकृतपणे कब्जा केली असून, क्रं २ वर्ग खोली वर कब्जा केल्यासंदर्भात,मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सोलापूर ,गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती अक्कलकोट तसेच दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट यांना लेखी निवेदन दिली असून वर्ग खोलीवर अनधिकृत कब्जा केलेल्या व्यक्तीची रीतसर चौकशी करून कार्यवाही करून कब्जा केलेली वर्ग खोली, जि प प्रा मराठी शाळेच्या ताब्यात द्यावे.संबंधित विभागांना निवेदन दिली असून आजतागायत कोणतीही चौकशी नाही.तसेच वर्ग खोलीवर बेकायदेशीर कब्जा केल्याने शिक्षणप्रेमी तून तीव्र नाराज आणि संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची मालमत्ता क्र २ मधील वर्ग खोली क्रमांक २ वर अनधिकृत पणे कब्जा केलेली आहे, ती वर्ग खोली आमच्या जि प प्रा म शाळेची मालमत्ता असून ती आमच्या ताब्यात द्यावे.
रमेश कोळी,मुख्याध्यापक
जेऊरवाडी
वर्ग खोली क्रं २ ही शाळेची जागा शासनाची मालमत्ता असून ती अशासकीय कामासाठी वापरता येत नाही, तात्काळ जागेची सखोल चौकशी व्हावी
श्रीदेवी राठोड, अध्यक्ष
शालेय व्यवस्थापन समिती
या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन,जे कोणीही चौकशी त दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल . प्रशांत अरबाळे
गट शिक्षण अधिकारी पं स . अक्कलकोट .