कौशल्य विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कांता नायक यांची नियुक्ती
विजयपूर /प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या व काॅग्रेस पक्षाच्या नेत्या कांता नायक यांची राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कांता नायक यांच्याबरोबरच राज्यातील ४४ काँग्रेस कार्यकर्त्यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या आणि केपीसीसीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हे पाऊल उचलले आहे.