पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी, दोन जणांवर गुन्हा दाखल
अक्कलकोट,प्रतिनिधी - लक्ष्मीकांत पोतदार
सोळसे गांधीनगर तांडा येथे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला शिवीगाळ,धक्काबुक्की करत दिली जिवे मारण्याची धमकी,देणाऱ्या दोघाजणांवर दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
हकीकत अशी की,सोळसे गांधीनगर तांडा ता अकक्लकोट येथे विश्वनाथ राठोड' शिवाजी नगर तांडा दुधनी यांनी ग्रामसेवक यांनी बोलविल्याने वृत्तांकन करण्यासाठी गेले असता श्री सेवालाल मंदीर जवळग्रामपंचायत चावडी वाचन झाल्यानंतर
येथे तुझे काय संबंध आहे.आमच्या ताड्यांत चावडी वाचनाला का आला.आपल्याला येथे कोणी बोलवलं,
असे म्हणत जगन्नाथ हिरू जाधव व मोहन
जाधव दोघे रा.सोळसे गांधीनगर तांडा यांनी१वाचेच्या सुमारास शिवीगाळी व दमदाठी करून दोन दिवसात जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेका.कोळी हे करीत आहे.
राज्यात सध्या वृत्तांकन करतांना पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.त्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे.धमकी देणाऱ्यांना पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद दाखल करण्यात यावा, अशी मागणी कमलाकर सोनकांबळे ता अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे वतीने केल्याची माहिती विश्वनाथ राठोड यांनी दिली.