Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेतील दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Responsive Ad Here

 दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेतील दहावी विद्यार्थ्यांचा  निरोप समारंभ


 

अक्कलकोट प्रतिनिधी- विश्वनाथ राठोड 

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी  येथील श्री एस जी परमशेट्टी प्रशालेत आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, व वार्षिक पारितोषिक वितरण परमपूज्य श्री जयगुरुशांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हिरेजेवर्गी  यांच्या दिव्य सानिध्यात व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला.



 कार्यक्रमाची सुरुवात शारदामातेचे पूजन महास्वामीजींच्या हस्ते केले व मान्यवरांचे स्वागत क्रीडा शिक्षक दत्तात्रय हिळळी यांनी केले, प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध अली गावे यांनी वार्षिक अहवाल सादर केले, तसेच कला क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या तालुका जिल्हा स्तर स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्तात्रय हिळळी यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार पाचव्यांदा मिळालं म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 तसेच बक्षीस वितरणाचा समालोचन सिद्धाराम नुला यांनी केले तसेच अध्यक्षीय भाषणात सिद्धाराम म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचा मुलांचा कार्य असून देशाचा उत्कृष्ट नागरिक शिक्षकाने घडवावा असा संदेश देताना फक्त शिक्षकच विद्यार्थी घडवतात असे नसून पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे व मोबाईल पासून आपल्या मुलांना दूर ठेवले पाहिजे अशा प्रकारचा कान मंत्र दिले.

 शेवटी स्वामीजींच्या आशीर्वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी दहावी विद्याथ्यांकडून प्रशालेला साऊंडसिस्टीम मोठी टेप गिफ्ट देण्यात आले याप्रसंगी माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे ,सुभाष परमशेट्टी, चंद्रशेखर खंडाळप्पा झळकी, यांचेही भाषणे झाले, याप्रसंगी संस्थेचे संचालक सातलिंगप्पा परमशेट्टी,  राजशेखर गाडी, शिवानंद माड्याळ, भीमाशंकर अंदेनी, बसवराज हौदे,  पिंटू माशाळ, हणमंत अलापूर, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ . प्रभावती हौदे, रेवणसिद्ध माशाळ,  गोरखनाथ  दोडमनी, मुख्याध्यापक रेवणसिद्ध अलीगावे, पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले तर मान्यवरांचे आभार सुरेश बिराजदार यांनी मांडले.