विजयपूर जिल्ह्यातील रामभक्त विशेष रेल्वेनी अयोध्या कडे प्रयाण
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रामभक्त,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि हिंदू युवा कार्यकर्ते विजयपूर रेल्वे स्टेशनमार्गे अयोध्येकडे रवाना झाले. त्यांना विजयपूर रेल्वे स्थानकावर रामाच्या दर्शनासाठी जाणारे अनेक हिंदू कार्यकर्ते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील कुचबाळ म्हणाले. अयोध्येकडे जाणाऱ्या भाविकांना शिस्त पाळण्याची येणाऱ्या सूचना दिल्या रात्री निघालेल्या ट्रेनमध्ये महिलांसह तीनशेहून अधिक भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह रामभक्त सहभागी झाल्या होते ट्रेनमध्ये जय श्री रामासह अनेक गाणी गात ते अयोध्येला रवाना झाले. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात जय श्रीरामच्या घोषणांनी दणाणले. माजी मंत्री एस के बेलोब्बी यांनी श्री राम मंदिराविषयी माहिती सांगितले आणि अयोध्येत विराजमान झालेल्या बालरामाची प्रत्येक भारतीयांना श्री रामाचे दर्शन घेण्याची इच्छा असून'.त्यासाठी या विशेष रेल्वेनी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. याप्रसंगी भीमाशंकर हदनूर, प्रकाश अक्कलकोट आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.