Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनी केंद्र शाळेत रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे जयंती मोठ्या उत्साहात साजरा

Responsive Ad Here

 दुधनी केंद्र शाळेत रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे जयंती मोठ्या उत्साहात साजरा




    दुधनी प्रतिनिधी- बसवराज बंद्राड 

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजां चे  जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे. 

       दुधनी येथील जि प प्रा केंद्र शाळेतील कन्नड,मराठी व उर्दु शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रारंभी शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सिध्दारामेश्वर गोरे  हे होते. याप्रसंगी मराठी शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष  गोरखनाथ धोडमनी, शिक्षण तज्ञ  सैदप्पा झळकी,सदस्य श्री महेदीमिंया जिडगे,कन्नड मुले शाळेचे ज्येष्ठ मुख्याध्यापक श्री हुड्डा ,मुली शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबा ,मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल  मलगाण ,उर्दु शाळा मुख्याध्यापक उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केली आहे.

       यावेळी मराठी शाळेचे लहान मुलांचे समयोचित भाषणे व महाराजांच्या  वेशभूषणात येऊन विविध कार्यक्रम साजरा करण्यात आली आहे.काही मुले भाषणे करुन महापुरुषांच्या जिवनावर बोलून महापुरुषांचे जीवनाचे परिचय करुन दिले त्यात प्राप्ती गंगावतीचे शिवाजी महाराजांचे जिवनावर आधारीत भाषणे आकर्षीत होते. चिमुकली प्राप्ती गंगावतीचे भाषणे आजचा शोशल मिडियावर वार्ता सारखे पसरून गंगावतीचे गुणगान होत आहे. 

          या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,शिक्षण तज्ञ सैदप्पा झळकी,सदस्य महेंदिमिंया जिडगे आणी चारही शाळेचे मुख्याध्यापक,सह शिक्षक संतोष जोगदे रविकुमार कोरसगावकर ,महांतेश कर ,श्री.मानकर ,श्री.बेण्णेसूर व सह शिक्षिका महानंदा जाधव,ज्ञानेश्वरी कारेकर व धनश्री गीण्णी तसेच सर्व विध्यार्थी,पालक उपस्थित होते.