Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दंड बैठक स्पर्धेत अजय यादव व नभा राणे प्रथम

Responsive Ad Here

 श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ


 दंड बैठक स्पर्धेत अजय यादव व नभा राणे प्रथम 


दोरी उडी स्पर्धेत यश जाधव व आसावरी गुरव प्रथम 



मुंबई : श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार मुंबई शहर व मुंबई उपनगरात अंतिम टप्प्यात पोहचला असून या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.



उपनगरात नेहरू नगर येथे मुबई शहर व उपनगरातील खेळाडूंची अंतिम दंड बैठक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत खालील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवले. 


१४ वर्षाखालील मुले १) गुलशन सिह (एम. एन. पी. हिंदी शाळा) , २) अहमद रज्जा (वामनराव शाळा), ३) आदित्य देवेंद्र (एम. एन. पी. हिंदी शाळा), ४) सोनु यादव.


१४ वर्षाखालील मुली १) आरुषी यादव (गुंदवली एम. पी. एस शाळा), २) संध्या गौड (गुंदवली एम. पी. एस शाळा), ३) स्वरा देशमुख (चुनाभट्टी एम. पी. एस शाळा), ४) समृद्धी नायक (तुळशी शाळा भांडूप)


१७ वर्षाखालील मुले १) प्रिन्स प्रजापती (चुनाभट्टी एम. पी. एस शाळा), २) रौनक केंद्रे (अमोदय विद्या मंदिर) , ३) वल्लभ सावलकर (मिठानगर एम. पी. एस शाळा), ४) निक बनसोडे (चुनाभट्टी एम. पी. एस शाळा)


१७ वर्षाखालील मुली १) मनीषा भूप (चुनाभट्टी एम. पी. एस शाळा), २) प्रिया यादव (अंधेरी टाटा कॅम्प) , ३) दीक्षा खारवार (गुंदवली एम. पी. एस शाळा), ४)  रिद्धी पाठक (मिठानगर एम. पी. एस शाळा).


खुला गट मुले १) अजय यादव (राहुल नगर), २) शब्बीर शेख (श्री गणेश शाळा), ३) कारण सिंग (गुंदवली शाळा), ४) स्वयंम देवळे (कांजूर मार्ग शाळा) 


खुला गट मुली १) नभा राणे, २) समृद्धी पवार, ३) अर्चना सहानी ४) आदिती उपाध्याय 


दोरी उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत १२ वर्षाखालील, १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व १७ वर्षावरील अशा चार गटात स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेत खालील खेळाडूंनी ३० सेकंदात सर्वाधिक दोरी उडी मारण्यात यशस्वी झालेल्या केलादुंना अनुक्रमे १ ते ४ क्रमांक मिळविले. 


१२ वर्षाखालील मुले १) आयुष झोटे (११६), २) अब्दुल शेख (११५), ३) आयुष माने (११४), ४) यश सिंग (११३)  मुली गट : १) आयशा शेख (११८), हिवा सतरा (११७), दृष्टी दाभी (१०९), झीनत शेख (१०७).


१४ वर्षाखालील मुले १) तरुण धनगर (१२९), निसर्ग नरसाळे (११७), दिशांक शाह (११४), अद्वैत रेडेकर (११३) मुली गट : १) लक्ष्मी चौधरी (११९), २) आर्वी संखे (११६), ३) अंजली स्वर्णकार (१०९), ४) ख़ुशी प्रजापती (१०३). 


१७ वर्षाखालील मुले १) आयुषकुमारी नाई (१३६), २) निशांत गुजरान (११५), ३) बिट्टू यादव (११२), ४) मित दातखिळे (११०) मुली गट : १) सान्वी जोगळेकर (११६), २) अलीया अन्सारी (११२), श्र३) द्धा कांबळे (१०५), ४) द्रीश्या सतरा (९७).


१७ वर्षावरील मुले : १) यश जाधव (१४५), २) प्रवीण गुप्ता (१३५), ३) आदित्य इप्ते (१३५), ४) आयुष सातवसे (१०९) मुली गट : १) आसावरी गुरव (९७), २) साक्षी धनकुळे (९५), ३) आंचल सहानी (९४) व पूनम काटखाडे (९३).

    

या सर्व विजेत्या खेळाडूंना प्रथम क्रमांकाला रोख रु. तीन हजार, द्वितीय क्रमांकाला रोख रु. दोन हजार, तृतीय क्रमांकाला रोख रु. एक हजार, चतुर्थ क्रमांकाला रोख रु. पाचशे, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.