म्हेत्रे प्रशालेतील विद्यार्थ्याना मिळाली आकाशवाणीत विचार मांडण्याची संधी
दुधनी प्रतिनिधी - बसवराज बंद्राड
आज दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सा. म्हेत्रे प्रशालेतील विद्यार्थ्याना सोलापूर येथे आकाशवाणी सोलापूर कडून संदर्शन ``2047 विकसित भारत का विकसित रेल्वे `` या उपक्रमांतर्गत आपले विचार आकाशवाणीतून प्रकट करण्याची संधी मिळाली. यामध्ये विनोद गोटे, तयब्बा चिद्री, अर्पिता म्हेत्रे, श्रावणी ओनमशेट्टी, मधुश्री कलशेट्टी या विद्यार्थ्यांनी आपापले मत मांडले. या सर्व विद्यार्थ्यांचे मत आकाशवाणी केंद्राचे निवेदक श्री. अभिराम सराफ यांनी रेकॉर्ड करुन घेतले.
लवकरच या विद्यार्थ्यांचे सोलापूर आकाशवाणी 103.4 या चॅनलवर प्रसारित कऱण्यात येईल असे सांगत सर्व विद्यार्थ्याना आकाशवाणीवर विविध कार्यक्रम कसे प्रसारित केले जाते याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. खरोखरच ही संधी नक्कीच प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. आकाशवाणी केंद्राविषयी संपूर्ण माहिती ही अनुभवातून मिळाल्याने सर्व विदयार्थी आनंद व्यक्त केले. या सर्व विद्यार्थ्याना सचिन बनसोडे यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. तरी त्यांचे देखील प्रशालेच्या वतीने आभारी आहोत.