शिरोळ तालुका कलाकार संघटनेतर्फे
चेअरमन गणपतराव पाटील यांचा सत्कार
भारतीय शुगरतर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते चेअरमन पाटील यांचा गौरव
शिरोळ : प्रतिनिधी- संजय सुतार
भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील "सहकार महर्षी पुरस्कार मिळालेबद्दल येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील ( दादा ) यांचा शिरोळ तालुका कलाकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिरोळचे ज्येष्ठ लोककलाकार पांडुरंग धनगर व विजय देवकुळे यांच्या हस्ते चेअरमन पाटील यांचा सत्कार झाला. अभिनेते निर्माते महादेव शिरोळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
येथे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर
आगमन होताच फटाक्याची आतषबाजी व हलगी ढोल यासह पारंपारिक वाद्यांच्या गजरात चेअरमन पाटील यांचे
रविवारी तालुक्यातील कलाकारांनी जल्लोषात स्वागत केले . एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केले तर प्रसिद्ध गायिका दिव्या मगदूम यांनी भक्तीगीत सादर केले. यावेळी सिनेकलाकार डॉ दगडू माने , महादेव शिरोळकर , ऋषिकेश कोळी ,नेत्रदीपा पाटील , रावसाहेब भोसले , जितेंद्र चौगुले आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम करताना सर्वांचे भक्कम पाठबळ मिळाले. त्यामुळे मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझा गौरव नसून शेतकरी ,कामगार , जनता आणि कारखाना हितचिंतकांचा आहे , शेतात राबणारा शेतकरी आणि स्वतःचे दुःख बाजूला ठेवून रंगमंचावरील कलाकार हा सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे आगामी काळात लोककला महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी सर्व कलाकारांचे आभार मानले.
यावेळी जेष्ठ कलाकार आनंदा कुंभार, हलगी सम्राट प्रशांत माने, मारूती कोळी, अनिरुद्ध कोळी, जनार्दन कांबळे, उदय शिरोळकर , सौरभ कोळी, जगनाथ कांबळे सर , ऋषिकेश कोळी, महेश शिकलगार, ऋषिकेश चौगुले, लक्ष्मण कांबळे, रावसाहेब भोसले, तेजस पाटील, विजय देवकुळे, पांडुरंग धनगर, सागर धनगर, महादेव शिरोळकर, नेत्रदिपा पाटील, सुषमा शिंदे, विजयराज कोळी, दिव्या मगदूम, कृष्णा लोहार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते
लोकेश पुजारी, दिलीप माने, शिवाजी माने -देशमुख, कॉन्ट्रक्टर अभिजीत माने, शिवाजी पाटील -कौलवकर, किरण पाटील - कणंगलेकर , वैभव माने , चिकू गुरव आदि उपस्थित होते.