सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी तिघांना महिलांना अटक
विजयपर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर शहरातील मुख्य बसस्थानक व सेट लाईट बस स्थानक परिसरात प्रवाशांचे सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी तिघांना महिलांना अटक पोलीसांनी करून त्यांच्याकडून रु 8 लाख 70 हजार रुपयांचे 146 ग्राम सोनं जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक शंकर मांदियाळ, पोलीस अधीक्षक बसवराज यलगार, पोलीस अधिकारी महांतेश दामण्णवर यांचा नेतृत्वाखाली पोलिस पथकाने विजयपूर सेट लाईट बस स्थानकाच्या परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या गंगुबाई नारायण काळे, नरसम्मा अमितकुमार पाटील व करिश्मा सहदेव उपाध्याय या तीन महिलांना चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्यांनी शहरातील मुख्य बसस्थानक, सेट लाईट बस स्थानक, गोदावरी हाॅटेल जवळील भाजी मार्केट परिसरात महिलांच्या व्हनिटि बॅग मधून सोन्याचं दागिने चोरील्याचे कबूली दिली असून एकूण पाच चोरी प्रकरणी या तिघांना अटक करून 146 ग्राम सोन्याचं दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहे.