मराठा सेवा संघ प्रणीत तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या अक्कलकोट तालुकाध्यक्ष पदी पत्रकार प्रशांत लक्ष्मणराव भगरे यांची निवड कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी केली आहे.
अक्कलकोट-
दरम्यान मराठा सेवा संघाच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी ते दि.२४ फेब्रुवारी पर्यंत शिवजयंती ते राजाराम महाराज जयंती पर्यंत छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांतर्गत नुकतेच जिल्ह्यातील पत्रकारांना तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीने गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील पत्रकार कक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्रशांत भगरे हे पत्रकार क्षेत्रात सन १९९८ पासून कार्यरत असून, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महा मंडळावर संचालक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची पत्रकारांची चळवळीची संघटना असलेल्या मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्य कारणी सदस्य महणून निवड झाली असून, विविध संघटना व अशासकीय पदावर कार्यरत आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत अभिनंदन होत आहे.