पत्नीच्या चारित्र्यावर संशय,
पतीने केला पत्नीचा खून
विजयपूर/प्रतिनिधी -दिपक शिंत्रे
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने दारुच्या नशेत आपल्या पत्नीवर फावड्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील हुबनूरु तांडा येथे ही घटना घडली असून रेश्मा राठोड ( वय 25 ) असे त्या दुर्दैवी महिले नाव आहे. अकरा वर्षापूर्वी अशोक राठोड याच बरोबर विवाह झाला होता. पती अशोक यास पत्नी रेश्मा हिचे दुसऱ्या कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होती. काल रात्रीच्या सुमारास पुन्हा त्यांच्या दोघात भांडण झाले. दारुच्या नशेत पती अशोक राठोड याने पत्नी रेश्मा हिचा फावड्याने वार करून खून करून पळून गेला आहे. तिकोटा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून आरोपीचा शोध व अधिक तपास सुरू आहे.