भावसार महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
प्रतिवर्षाप्रमाणे विजयपूर भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने रथसप्तमीच्या दिवशी हळदीकुंकू व वाण वाटप कार्यक्रम शहरातील आनंद नगर येथील भावसार सांस्कृतिक भवनात उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या मुख्य पाहुणे म्हणून पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या, प्रेमजी फांऊनडेशनच्या प्रमुख सौ.सुनीता रगदळ पिसे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात हिंगलाज भजन मंडळाच्या सदस्यांनी प्रार्थना गीतानी सुरुवात करण्यात आले
विष्णू सहस्रनाम आणि हरी पथांच्या आध्यात्मिक वाचन ही करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सुनीताताई रंगदळ पिसे म्हणाला, समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव न करता समान शिक्षण देण्यात यावे विशेष करून मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचे कार्य करावे पुढील पिढीला सुसंस्कृत बनविण्याची जबाबदारी महिलांची असल्याचे मत व्यक्त करुन शिक्षणा बरोबरच आपल्या मुला मुलींना धार्मिक संस्कार संप्रदाय, आचरण करण्या बरोबरच अध्यात्मिक आवड निर्माण व्हावी यासाठी महिलांनी लक्ष पुरविणे आवश्यक आहे असे सांगितले
याच कार्यक्रमात कु .समृद्धी आकोड हिने मोहक भरतनाट्यम सादरीकरण केले.
भावसार महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्माताई इजंतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .रुपा हिबारे यांनी केले
भावसार महिला मंडळाच्या सौ.शैला महिंद्रकर,सौ. राजेश्री हिरासकर,सौ. निर्मला सुलाखे,सौ.नंदा पुकाळे, सौ. बिना नवले, सौ रुपाली हंचाटे व समाज भगिनी उपस्थित होते.