विजयपूरात बेहिशेबी 2 कोटी 93 लाख रुपये जप्त
विजयपुर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या कार मधून बेहिशेबी रु 2, कोटी 93 लाख 50 हजार रोख रक्कम विजयपूर सीईएन पोलिसांनी जप्त केली आहे.
विजयपुर जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांना या संदर्भात माहिती दिली असून तेलंगण राज्यातील हैद्राबाद येथून हुबळीकडे अवैधरित्या पैसे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री सीईएन पोलीस ठाण्याचे सीपीआय सुनीलकुमार नंदेश्वर, कर्मचारी एम. के. हावडी, डी. आर. पाटील, एम. बी. पाटील, मल्लू हुगार यांनी विजयपूर शहरातील सिंदगी बायपासवर ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडून ती रोखड जप्त केले आहे
याप्रकरणी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बालाजी निक्कम आणि सचिन मोहिते या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तसेच त्यानी वापरलेली एमएच-01/सीडी-7537 कार आणि दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत.
या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी दिली.