रिपाइंला वगळून महायुती, लोकसभेचे उमेदवार निवडून येणे अशक्य-सैदप्पा झळकी
नंतर रिपाइंला दोष देऊ नये-झळकी
अक्कलकोट प्रतिनिधी- विश्वनाथ राठोड
देशातील आगामी लोकसभेचे निवडणूक रिपाइं (आठवले गट) ला बाजूला ठेऊन महायुतीला सत्तेत येणे अशक्य असल्याचे प्रतिपादन रिपाइं सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन पक्ष हा डां.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असल्यांने त्या पक्षाला मानणारे लोक खूप आहे. आणी रिपब्लिकन पक्ष(आठवले गट) चे मतदार व कार्यकर्ते महाराष्ट्रा सहित देशातील अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. जर आपण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डां.रामदास आठवले व प्रदेश अध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे यांना महायुतीत शिर्डि व सोलापूर लोकसभेचे जागा रिपाइंला सोडले नाही तर रिपाइं मतदार शंभर टक्के नाराज होऊन महायुतीच्या विरोधात मतदान करतील. कारण रामदास आठवलेंना देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात राजाभाऊ सरवदे यांना मानणारे लाखोंच्या संख्येने असून येवढे मतदारांना नाराज करुन भाजपाला सत्तेत येणे अशक्य आहे. परिणामी भाजपा सत्तेपासून वंचित होईल.नंतर रिपाइंला दोष देऊ नये.असे परखड मत सैदप्पा झळकी यांनी केली आहे. तरी महायुतीतील भाजपाचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य विचर करुन निर्णय घ्यावून दोन जागा रिपाइंचे सोडण्यात यावे. अन्यथा दोन जागेसाठी देशभरातील अनेक जागा गमावून सत्तावंचीत होईल यात तिळमात्र शंका नाही.आमच्यमुळे तुम्हाला देशात सत्ता हवे असेल तर आमच्या वाटेने जागा आम्हाला द्यावे.असेही सैदप्पा झाळकी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले.