Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

Responsive Ad Here

 'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात



जयसिंगपूर /प्रतिनिधी:- संजय सुतार 

   "सावित्रीच्या लेकी" या मासिकाच्या वतीने आयोजित 12 वा 'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार हे होते.

       महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, त्यांच्यात सांस्कृतिक, आर्थिक,

कौटुंबिक आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी तसेच मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि आदर्श नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी 'सावित्रीच्या लेकी' हे मासिक गेल्या १३ वर्षापासून कार्यरत आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापनातून संस्कारक्षम, यशवंत विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशिल शिक्षिकांच्या तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य व विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची खास नोंद घेवून 'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' हा मानाचा पुरस्कार देवून महिलांना गौरविण्यात आले. 

    प्रा. डॉ. मोहन पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस, प्रसिध्द गझलकार प्रसाद कुलकर्णी, प्रेरणादायी वक्ते डॉ. अजय मस्के, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, सिने अभिनेत्री डॉ. पद्मजा खटावकर यांनी मनोगत व्यक्त करून सत्कारमूर्तींना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



सत्कारमूर्ती महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

    प्रारंभी क्रांतीबा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 'आम्ही सावित्रीच्या लेकी' या  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले. सूत्रसंचालन सौ. स्वाती भापकर यांनी केले तर आभार मासिकाचे संपादक संजय सुतार यांनी मानले. यावेळी श्रीनिवास देशपांडे, उत्तम सुतार, महेश परीट, अतुल भोजणे, इकबाल इनामदार, राजकुमार नकाते, बाबासाहेब बागडी, अमोल सुतार, बबन जामदार, अजित कांबळे, नंदकुमार सुतार, सौ. मंगल सुतार, सौ. सुप्रभा माळी, बाबासाहेब नदाफ, कनक शहा, दीपक पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा हॉल, नांदणी-जयसिंगपूर रस्ता, ता. शिरोळ येथे हा कार्यक्रम झाला.