युवा नेतृत्व -युवकांचा युवा योद्धा निलेशभैय्या धाराशिवकर वाढदिवस विशेष
शब्दांकन- वसंत पोतदार सोलापूर
एक संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतिशील, आक्रमक समाज नेत्याचा, सोलापूर जिल्हा पांचाळ सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष सुवर्ण उद्योग रत्न निलेश भैय्या धाराशिवकर यांचा आज वाढदिवस आहे. कमी वयात धाराशिवकर यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील प्राध्यापक नागनाथराव धाराशिवकर यांच्या समृद्ध समाजकारणाचा वारसा मिळाला असला तरी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या ध्येय्यासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, समाज बांधव, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाही तर ते टिकवण्याची शिकवण ही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. समाज बांधवांचे, कारागीरांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या निलेशभैय्या .
कोविड 19 या जागतिक महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले जीवन जेवढे मौल्यवान आहे तेवढे दुसऱ्यांचे जीवन मौल्यवान आहे या सामाजिक बांधिलकीतून गरीब व गरजूना मदत. व सहकार्य केले. तसेच सुवर्ण कारागीरसाठी तत्कालीन सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख साहेब यांना त्यांच्या सहकारी बांधवासह भेटून गरजूना आर्थिक मदत म्हणून पन्नास लाखाचे कर्ज मिळवून दिले. त्यांच्या या प्रेरणादायी कामाबद्दल सोलापूर पांचाळ सोनार समाज गौरव समिती कडून त्यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. गतवर्षी त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन सुवर्ण उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निलेशभैय्या यांना मी जसं पाहतोय तसं ते सर्व जाती, धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतिशील नेत्यांची आहे. आजचा दिवस खूप खास आहे.
समाजामध्ये निलेशभैय्या सर्वात अधिक सक्रिय असणारे युवा नेते आहेत. त्यांच्या हाकेला युवकांचा प्रतिसाद असतो. तुम्ही नाही आम्ही या तत्वावर सर्वाना एकजुटीने सोबत घेऊन चालणारे, त्यांना त्यांच्या कार्यामुळेच सर्वांनी भैय्या ही पदवी आपोआपच बहाल केली आहे.
निलेश भैय्या धाराशिवकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास खूप खूप शुभेच्छा .