Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ओबीसी बहुजन पार्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ लढवणार : दिगंबर लोहार

Responsive Ad Here

 ओबीसी बहुजन पार्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ लढवणार : दिगंबर लोहार


      इचलकरंजी/प्रतिनिधी:

भटके, विमुक्त, ओबीसी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समाजाच्या घटनात्मक हक्क संरक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश (अण्णा) शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे. संविधानिक हक्क टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार यांनी केले.

       हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ओबीसी, भटक्या विमुक्त व अल्पसंख्याक समाज चळवळीतील सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील प्रमुख व सक्रिय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक इचलकरंजी ताटे वाडा येथे झाली. यावेळी दिगंबर लोहार बोलत होते.

     आरक्षणातील घुसखोरी, ओबीसी, भटक्या विमुक्त व अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय- अत्याचार याबाबत या मतदारसंघातील कोणताही इच्छुक उमेदवार अथवा राजकीय पक्ष चर्चा करण्यास तयार नाही. भटके विमुक्त व ओबीसी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजांच्या समस्याच नाहीत असे समजून त्यांना डावलण्यात येत आहे. याबाबत सर्वांनी तीव्र नाराजी व चिंता व्यक्त करून  लोकसभेसाठी तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.   

      ज्येष्ठ नेते बजरंग लोणारी म्हणाले, देशात ओबीसी समाज बहुसंख्येने आहे, महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे.

दिवंगत पंतप्रधानांनी ओबीसींना आरक्षण दिल्याने राजकीय पटलावर अल्पसा वाटा मिळाला. इतर राजकीय पक्षांनी बहुसंख्य असणाऱ्या ओबीसींचे

राजकारणातील प्रतिनिधीत्व तोकडे ठेवले.

अलिकडे विशिष्ट उच्चभ्रू समजले जाणारे  समूह ओबीसी कोठ्यातूनच आरक्षणाची मागणी करुन आमचा वाटा कमी करताहेत.

यावर समाज संघटीत करुन राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शिरकाव करुन सामाजिक, राजनैतिक, संविधानिक हक्क पदरात पाडून घेण्यासाठी जागृती आणि संघटन करणे आवश्यक आहे.  

ज्येष्ठ नेते कल्लाप्पा गावडे म्हणाले, माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारले जात आहेत. आजही जातीची कामे त्याच जातीच्या लोकांनी करावीत अशी व्यवस्था तयार केली जाणार असेल तर भटके, विमुक्त ओबीसी, मागासवर्गीय समाज आणि अल्पसंख्याक समाजाने एकत्रित येऊन आपल्या हक्काचा व समाजाचा उमेदवार विजयी करावा.

     डॉ. संजय कोळेकर यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपलाच उमेदवार लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी  बाळासाहेब लोहार, संजय गोसावी, यशवंत सुतार, रामचंद्र डांगे, सुनील मेटे, योगिता घुले, अक्षय कारिगार यांनी मनोगत व्यक्त केले

      याबाबत लवकरच मेळावा घेऊन रणशिंग फुंकण्याचे निश्चित करण्यात आले. सदरच्या बैठकीस धोंडीराम जावळे, नौशाद जावळे, शकील शेख, संजय गोसावी, रवींद्र कांबळे,  यशवंत सुतार, अशोक काळे, पांडुरंग सुतार, राजाराम लोहार, संग्राम कांबळे, रंगराव कांबळे, सुधीर आदमाने, अनिल बनकर, सुनीता गावडे, स्वाती पुजारी, एकनाथ कुंभार, रमेश लोहार, संतोष पाटील, सुजित गरड, जीवन पोतदार, अक्षय कारिगार, आनंदा लोहार,  योगेश कुंभार, राजेंद्र हराळे, दत्तात्रय सातार्डेकर आदी नेते उपस्थित होते. शेवटी आभार जयवंत ताटे यांनी मानले.