बार पेक्षाही कमी स्वस्तात दारु; बसल्याठिकाणी मिळवा सर्व प्रजातिचे दारु
अक्कलकोट- दुधनी म्हंटले की सर्व दोन नंबर धंदे बिनधास्तपणे चालतील आणि इथे कोणाचाही भिती नाही, त्याचप्रमाणे मटका नंबर खेळायचा आहे ते ही कुणाला न कळता, चोरुन तर फक्त एक फोन करा अथवा मॅसेज पाठवा मटका नंबर झाला तुमचा बुकिंग, आजकाल रेल्वे तिकीट सुध्दा इतके लवकर होत नाही बुकिंग.
अश्याच प्रकारे तुम्हाला दारु प्यायची ईच्छा झाली तर एक फोन करा अथवा मॅसेज घर बसल्या पाहिजे, दुकानात, किंवा शेतात हवा तो ( ब्रॅन्ड) मिळतो,दुधनी शहरात पान टपरी, किराणा दुकान, पडीक जागा, व घरा घरात ऑर्डर करु शकता.
दुधनी गावात दोन परमीट बार असुन सुद्धा इतका मोठा धंदा बाहेर चालु असतो कारण आजकाल महागाई फार वाढलेली आहे बार पेक्षा ही वीस- तीस रुपये कमी मधी तेही बसल्या ठिकाणी मिळतो, सर्व सामान्यांचे दुर राहिले मोठ मोठ्या दिग्गज सुध्दा बाहेरूनच बसल्या ठिकाणी मागवतात.
आजकालच्या ह्या मुळे लहान मुले बिघडत आहेत, दुधनीतील तीन बगीचा व भाजीपाला मार्केट तळीरामांची बार (अड्डा) बनली आहे. तालुक्यातील मोठमोठे नेते व प्रशासन दुधनीतील या सर्व अवैध धंदे बद्दल गप्प का आहेत हे दुधनीकरांना प्रश्न पडला आहे.