शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये प्रा.संशोधक आरिफ शेख यांच्या संशोधनाला प्रथम क्रमांक
कोल्हापूर प्रतिनिधी-
शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये प्रा. व संशोधक आरिफ अमिन शेख यांच्या संशोधनाला प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
संशोधनाचा विषय हा ऍनिमल हसबंडरी डिपार्टमेंट (गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र) कडून आलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वरती होता . एनिमल्स मध्ये आर्टिफिशियल इन्सिमिनेशन ही एक प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये एनिमल्स विशेषता गाई व म्हैस हे हिट पिरेडमध्ये असताना त्यांना आर्टिफिशियल इन्सिमेशन करत असताना सिमेंन क्वालिटी विशेषता त्याचं तापमान हे योग्य पद्धतीत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी त्याची क्वालिटी योग्य राहावी यासाठी प्रा. अरिफ शेख यांनी बरेच महिने यावरती काम करून एक उपयुक्त व सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल असे 100% मेड इन इंडिया असे उपकरण तयार केले या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी विशेषता त्याच्या हिट पिरेडमध्ये त्याला योग्य पद्धतीने इन्सिमिनेशन होण्यासाठी या उपकरणाची खूप मदत होणार आहे. नुकताच भारत सरकारकडून या युनिटला पेटंट सुद्धा मिळालेला आहे.
या संशोधनाच्या विषयाअंती दोन युनिट तयार करण्यात यश आलेला आहे युनिट नंबर वन हे कॉम्पॅक्ट व व्हेटर्नरी डॉक्टर इसिली हँडल करू शकतील असे आहे व हे पूर्णतः ग्रीन पॉवर म्हणजेच सोलार पावर वरती ऑपरेट होणारे आहे .युनिट नंबर दोन हे लॅबोरेटरी मॉडेल डेव्हलप केलेले आहे.
या विषयाच्या पुढील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाकडून (UIIC & IIC) सीड फंडिंग ची व्यवस्था होणार आहे.