Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बबलाद येथे जुन्या पाण्याच्या टाकीचे पाडकाम करीत असताना अचानक टाकी कोसळल्याने एक मजुर जागीच मृत्यू .

Responsive Ad Here

 बबलाद येथे जुन्या पाण्याच्या टाकीचे पाडकाम करीत असताना अचानक टाकी कोसळल्याने एक मजुर जागीच मृत्यू .




अक्कलकोट प्रतिनिधी- विश्वनाथ राठोड 

   अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथे शासनाच्या पेय जल योजने अंतर्गत व गाव अंतर्गत पाईपलाईन व पाण्याच्या टाकी बांधणे काम मंजुर असून काम चालू आहे .

        नविन टाकी बांधकामास जागा नसल्याने २० वर्षपूर्वी बांधलेली टाकी पाडकाम करून त्या ठिकाणी नविन टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने जि . प . सोलापूर यांचे कडे रितसर परवानगी घेऊन दोन दिवसापूर्वी काम चालू केले आहे . सदर पाडकाम अक्कालकोट येथील एका ठेकेदारास काम दिले होते . सदर टेकेदाराने मंगळवार रोजी सकाळी बबलाद येथे सदर जुन्या टाकीचे पाडकाम करण्यासाठी अक्कलकोट येथील पाच मजुरांना पाठविले होते . सकाळी पाडकाम करीत अगोदर दोन कॉलम कट करून दुसर्या दोन कॉलम कट करीत असताना व दोन जेसीबी सुद्धा लावलेली असताना अचानक टाकी कोसळली . त्याखाली सददाम  नदाफ वय 25 रा अक्कलकोट खाली सापडल्याने जागीच मरण पावला आहे .



       याबाबत माहिती मिळताच अक्कालकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पो. नि . महेश स्वामी , मुतु खेडगी , अश्पाक बळुर्गी , उपसरपंच रमेश रोडगे , सद्दाम शेख , राजकुमार लकाब शेट्टी , एजाज मुतोली , बाबु नदाफ , मल्लु पाटील , सद्दाम शेरीकर , यांनी घटनास्थळी भेट दिली .

     पाडकाम करताना सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नव्हते . मयताला तीन तासाच्या अथक पयत्न करून गावकर्यानी बाहेर काढले 

  सदरची जागा नविन टाकी बांधकामास तांत्रिक दृष्ट्या योग्य नाही दुसरीकडे जागा उपलब्द असताना ग्रामसेवक व सरपंच यांच्या आडमुठ धोरणामुळे हा प्रसंग घडला असल्याचे ग्रामस्तांचे म्हणणे आहे .