दुधनी येथे विविध विकासकामाचे भुमीपुजन
अक्कलकोट- दुधनी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामाचे भुमी पुजन करण्यात आला,त्यानंतर नागरी सत्कार व सभा संपन्न झाला.
सर्व प्रथम फोटो पुजा व दिपप्रज्वलन आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी केले त्यानंतर मान्यवरांचे सत्कार समारंभ झाला. कृ.उ.बा.समितीचे सभापती सातलिंगप्पा (अप्पु) परमशेट्टी यांनी दुधनी विकास कामासाठी निधी दिलेली रक्कम पाच कोटी वीस लाख रुपये आ.कल्याणशेट्टी यांनी दिल्याची माहिती वाचून परमशेट्टी यांनी सांगितले.
110 वर्षापासून पाण्यासाठी दुधनी वंचित- आ.सचिन कल्याणशेट्टी
गेल्या 110 वर्षांपासून दुधनी शहरात नगरपरिषद आहे आणि भारत स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवही झाला पण दुधनी गावातील पाण्याची समस्या जशाच तसे आहे.
पुढे बोलताना म्हणाले की मी आमदार झाल्यापासून दुधनीचा पाण्याची समस्या कसे मिटवावे हे मला सतावत होती म्हणुन कुरनुर धरणातून पाणी सांगवीला आणुन तिथुन पाणी पाईप लाईनद्वारे दुधनीला पाणी देणार व सध्या कामही चालु आहे पुढच्या उन्हाळा पर्यंत दुधनीतील पाण्याचा प्रश्न मिटुन जाईल असे आ.कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
यावेळी रामचंद्र बिराजदार, महेश पाटील, मोतीराम राठोड, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, विठ्ठल अमाणे, काशीनाथ यरगल, बाबा टक्कळक्की, रेवणसिध्द माशाळ, प्रतिष्ठित आडत व्यापारी आदी गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.