......या कारणामुळे भुमीपुजन न करताच परतले आ.सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट- काल दुधनी येथे विविध विकासकामाचे भुमी पुजन आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते भव्यदिव्य पध्दतीने करण्यात आला, माञ धनगर समाज मंदिराचे भुमी पुजन न करताच आ.कल्याणशेट्टी परतले.
दुधनी गावातील सिध्देश्वर नगर, लक्ष्मी गल्ली येथील ऐश्वर्या हाॅटेल शेजारच्या बगीच्यामध्ये धनगर समाज मंदिराचे भुमी पुजन करणार होते, माञ लक्ष्मी गल्ली येथील महिला,पुरुष लहान मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्थानिक लोक म्हणाले की इथे पुर्वी पासून बगीचा होता आणि बगीचाच असणार इतर कुठल्याही समाज मंदिर किंवा जिमखाना करु देणार नाही, लहान लेकरांच बगीचाच सुधारणा करा असे म्हणत लोकांनी विरोध करत जमाव झाले.
याची सविस्तर माहिती श्रीशैल झळक्की यांनी सांगितले कि आम्ही आ.सचिन कल्याणशेट्टी यांचा विरोध करायला आलो नाही, किंवा धनगर समाजालाही विरोध करत नाही इथे जर कुठलाही समाज मंदिर झाला तर आमच्या लिंगायत समाज मंदिरासाठी म्हेत्रे प्रशालेच्या शेजारील बगीच्यामध्ये आम्हाला ही बांधून द्या, आम्ही दुधनी नगरपरिषदेमध्ये दोनंदा निवेदन दिले आहे, माञ समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी आतिष वाळुंजे यांनी करत आहेत असे प्रतिपादन झळक्की यांनी केले.
याच कारणामुळे वादविवाद होऊ नये म्हणून आ.कल्याणशेट्टी भुमी पुजन न करताच परतले.