Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख

Responsive Ad Here

 जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख



       अक्कलकोट विशेष प्रतिनिधी- 

                                      पिंकू कोलाटी    [वाहक व नाट्य कलावंती    ]    अक्कलकोट तालुक्यातील दुधनी गावातील पिंकू कोलाटी यांचे जन्म अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात झाले . त्यांची घरची परिस्थिती अत्यंत खूप हलाखीची होती लहानपणापासून आपली गरिबी काढून आपली परिस्थिती बदलू   असे ठाम इच्छा होते , अत्यंत साधा घरात राहत होते घरात उजेडासाठी लाईटची सुद्धा सोय नव्हती पण ती   दिव्याखाली अभ्यास करत होती.

        घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने  मावशी  सरोजा कोलाठी  यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी कन्नड सामाजिक नाटक मध्ये भूमिका सादर करण्यास सुरू केली . नाटकाच्या माध्यमातून मिळालेले पैसे त्यांनी पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या करिअरसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली, रात्रभर नाटक मध्ये भूमिका सादर करून दिवसभर एकांकिकात होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून स्पर्धा परीक्षा तयारी करत होते, अधुन मधून नाटक मध्ये ही भूमिका सुद्धा सादर  करत होते.



      पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती अनेक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा दिली त्यातून त्यांना अपयश आलं परत काहीच दिवसांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहकांची भरती सुटली त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जिद्दी चिकाटी मेहनतवर  वाहक म्हणून निवड झाले. गेल्या दहा वर्षापासून पिंकू कोलाटी यांनी  वाहक म्हणून कार्यरत आहे प्रवाशांना अत्यंत नम्रतेने वागत असते,व तसेच वेळेनुसार कन्नड सामाजिक नाटक मध्ये भूमिका करत असतात. 

      जीवनात एकादी गोष्टीची अपयश आले की  खचून आत जाता जिद्द चिकाटी मेहनत करून स्वतःचे करिअर घडवावे.  वाहक व  कन्नड नाट्य कलावंती म्हणून ही त्यांचं नाव ख्याती   आहे.