खो खो स्पर्धेतील विजेता उर्दु शाळेतील विध्यार्थ्यांच्या दुधनी मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार
दुधनी(प्रतिनिधी)दि ८-जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा दुधनी येथील विद्यार्थ्यांनीच्या महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय उर्दू दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खोखो व लंगडी या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट विजय मिळविल्याबद्दल व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल मुस्लिम जमात दुधनी तर्फे सर्व विजेता मुलांना स्कूल बॅग देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम दुधनी उर्दू शाळेत संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कासिम खैराट होते. यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जिलानी नाकेदार,व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युसुफ जीडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन उर्दू शाळेतील विद्यार्थिनी कुमारी यास्मिन मुजावर यांनी केले, यावेळी गुलाब रेऊर, वाजिद खैराट, मोहम्मद साहब बांगी, इस्माईल मनियार, हमीद भाई बडे खान, चिंनु मणियार, मौला पठाण, नाजिम बळूर्गी, गौस शेखजी ,मोसिन मोमीन, उमर मणियार, आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती लतिफा बांगी मॅडम व बागवान सर यांनी परिश्रम घेतले. शेवटी फैयाज सुतार सरांनी आभार मानले.