विजयपूर. दिपक शिंत्रे
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर पाॅक्सो कायदा अंतर्गत गुन्हा प्रकरणी
येडियुरप्पा यांचे स्पष्टीकरण
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या विरुद्ध एका 17 वर्षांचा मुलीचा आईने केलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात बेंगळुरू येथील सदाशिव नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्पष्टीकरण देताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले,, दिड महिना पूर्वी ती महिला तिच्या मुली सोबत आली होती, तिला घरी बोलावून काय समस्या आहे असे विचारले असता,, तिने आपल्यावर ( तिच्या वर) अन्याय झाले असल्याचे सांगितले. तिची विचारपूस करून,, मी पोलिस आयुक्तांना फोन करून एका महिलेवर अन्याय झाल्याचे सांगत असून या प्रकरणी चौकशी करून त्या महिलेला न्याय मिळवून द्यावे असे सांगितले.
ती महिला अडचणीत असल्यामुळे तिला आर्थिक मदत ही केली. केलेल्या उपकाराची परतफेड अशारीतीने करतात हे आश्चर्यकारक असल्याचे सांगून, तक्रार तर दाखल झाली आहे त्यास कायदेशीर तोंड द्यावे लागेल असे स्पष्टीकरण दिले आहे