प्रियांका इंगळे महाराष्ट्र महिला खो-खो संघाची कर्णधार
झांसी येथे होणाऱ्या खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो-खो लीग स्पर्धेत संघ भाग घेणार
मुंबई (क्री. प्र.) : - बाळ तोरसकर
युनिवर्सिटी स्पोर्ट्स ग्राउंड, भूदेलखंड युनिवर्सिटी, झांसी, उत्तर प्रदेश येथे दिनांक १७ ते १९ मार्च २०२४ या कालवधीत होणाऱ्या खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो खो लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला संघ महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केला. या संघाच्या कर्णधारपदी पुण्याच्या प्रियांका इंगळे हिची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडूंनी १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे जयांशु पोळ (मो.९४२२३४७६९९) यांच्याशी संपर्क साधावा. निवड झालेल्या खेळाडूंनी मॅट शूज, आधार कार्ड, बँक पासबुक, मूळ जन्मतारखेचा दाखला किंवा १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व २ फोटो सोबत आणावेत.
या संघास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ.चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड.अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
महिला संघ: प्रियांका इंगळे (कर्णधार), रितिका राठोड, कोमल दारवटकर, काजल भोर, भाग्यश्री बडे (सर्व पुणे), अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे (सर्व रत्नागिरी), रेश्मा राठोड (ठाणे), संध्या सुरवसे, किरण शिंदे, प्राची जटनुरे (सर्व धाराशिव), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), दिव्या बोरसे (छ. संभाजीनगर), कल्याणी कंक (ठाणे)
प्रशिक्षक : विकास सूर्यवंशी (छ. संभाजीनगर), सहा. प्रशिक्षक: श्री जयांषु पोळ (जळगाव), व्यवस्थापिका: लता पोळ (जळगाव).