बापरे...! दुधनी नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे;या गटारीने घेतले दोन मुलांचे 80 हजार रुपये...?
दुधनी- येथील भाजीपाला मार्केट मागील लक्ष्मीनगर मधील लक्ष्मीपुत्र बिराजदार यांच्या घरातील खळबळजनक घटना.
गेल्या एक वर्षापासून बिराजदार यांच्या घरा लगतच्या गटार तुंबले असुन, गटारातील पाणी, कचरा तिथेच साचले असुन तिथे घाण वास व डासांचे साम्राज्य वाढलेला आहे.त्यामुळे त्याभागातील लहान मुले, वयोवृद्ध लोकांना मलेरिया, डेंग्यु या सारख्या रोगांना बळी पडत आहेत.
त्यामुळे बिराजदार यांनी गेल्या एक वर्षापासून दुधनी नगरपरिषदेमध्ये तक्रार करत आले तरी या
गटारीचे काम अजुन ही झाले नाही व आजाराचे बळी थांबलेला नाही.
बिराजदार यांनी सांगितले की माझ्या दोन मुलांना कलबुर्गी येथील डाॅ. मोरे व सोलापूर येथील डाॅ. अरकल येथे मी तब्बल 80 हजार रुपये या गटारीमुळे माझ्या मुलांना पैसे खर्च केले असल्याचे सांगितले.
आता तरी जागे व्हा दुधनी नगरपरिषद हो, गटार दुरुस्ती करा,नाही तर कर भरणार नाही असे बिराजदार यांनी म्हणाले. आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी शहराला भरपूर निधी मंजूर केले पण त्या निधी फक्त आणि फक्त मुख्याधिकारी 30% , ठेकेदार 20% अजुन बरेच काही हिशोब केले असता दुधनी गावात फक्त 40%पेक्षा कमी स्तरावर काम होताना दिसतो म्हणून बिराजदार यांनी सांगितले.