Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री दत्त भांडार मध्ये स्व. सा. रे. पाटील यांना अभिवादन

Responsive Ad Here

 श्री दत्त भांडार मध्ये स्व. सा. रे. पाटील यांना अभिवादन 



शिरोळ/ प्रतिनिधी: संजय सुतार 

  माजी आमदार व दत्त उद्योग समुहाचे प्रेरणास्थान स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील श्री दत्त भांडार मध्ये सा. रे. पाटील व त्यांचे गुरु एस. एम. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. तसेच मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि आंबा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.



      साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, शामराव पाटील, अनिलकुमार पाटील, कारखाना व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कारखाना कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालिका विनया घोरपडे, संगीता पाटील, यशोदा कोळी, संचालक रघुनाथ पाटील, अमर यादव, इंद्रजीत पाटील, एडवोकेट प्रमोद पाटील, विजय सूर्यवंशी, अंबादास नानीवडेकर,  कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतलेल्या श्री दत्त भांडारच्या महिला कर्मचारी रंजना बागडी, संगीता वाडीकर, कार्तिका कृष्णन तरम्मल यांचा सत्कार गणपतराव पाटील, डॉ. दगडू माने व राजेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आला. 

    यानंतर खास ग्राहकांसाठी शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले. मे ठाकूर ऍग्रो सर्व्हिसेस वेंगुर्ला यांच्यावतीने आंबा उत्पादक रत्नदीप धुरी यांनी सर्वांचे स्वागत केले. गणपतराव पाटील यांच्या हस्ते पहिल्या आंबा पेटीची विक्री ग्राहक डी. आर. माने यांना करण्यात आली. यावेळी दत्त भांडारचे जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे, एल. बी. सय्यद, सुहास मडिवाळ, दीपक ढोणे, संतोष सुतार, शहाजहान बाडकर, यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.