दुधनीतील जीवघेणा भाजीपाला मार्केट
दुधनी- येथील भाजीपाला मार्केट येथे 11के.व्ही लाईन भाजीपाला मार्केटच्या पत्र्याला लागली असुन, दोन महिन्यांपूर्वी एका इस्माला करंटचा झटका लागुन खाली पडल्यामुळे डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तो अजुनही कोमात असल्यागत आहे. हा घटना घडल्यापासुन भाजीपाला मार्केट मधील लोकांनी तक्रार देतच आहेत या तक्रारीचा दखल कधी होणार....?
दुधनीत दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो आणि या बाजारात हजारोंच्या संख्येने लोक येतात, तसेच ज्या ठिकाणी 11के.व्ही लाईन पत्र्याला लागली आहे त्या खाली शेकडो लोकांचे देवाण घेवाण व व्यापारी बसले असतात. सध्या दुधनी शहरात विज सुरळीत तर नाहीच कारण अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे वारंवार विज खंडीत करत आहेत. मात्र याच वार्यामुळे भाजीपाला मार्केटच्या पत्र्याला 11के.व्ही ची लाईन लागली तर शेकडो लोकांचे जीव धोक्यात येते. M.S.C.B.वाले जिव गेल्यावर दुरुस्ती करणार की काय....? असे प्रश्न जमीर शेख व व्यापारी बंधु करत आहेत.