दुधनी विद्युत केंद्रासमोर शेतकर्यांचे आक्रोश
उद्या पर्यंत विज पुरवठा सुरळीत नाही झाल्यास विद्युत वितरणाला जाळुन टाकु- संतप्त शेतकर्यांचे आव्हान
दुधनी- येथील सोळसे तांडा डेपो, सोंडे डेपो, माड्याळ डेपो व जुना डेपो, म्हेत्रे डेपो, चिंचोळी शिवार डेपो, गौडगाव डेपो तसेच भीमनगरात तीन वादळी वार्यामुळे तीन पोल पडले असुन या शिवारात पाच दिवसापासून विद्युत पुरवठा बंद आहे त्यामुळे भीमनगरात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे, शिवाय शेतकर्यांना जनावरांसाठी गावातुन मोटार साईकल वरुन पाणी न्यावे लागत आहे ह्याचे सर्वेसर्व कारण दुधनी विद्युत केंद्र असल्याचे माहिती दुधनी बसपाचे सेक्टर अध्यक्ष बसवराज जन्ना यांनी सांगितले.
पुढे शेतकरी बोलताना म्हणाले की शेतकी लाईन सुध्दा पाच दिवसापासून बंद आहे दुधनी केंद्राचे सचिन माने इनचार्ज साहेब हे महिन्यातून एकदा हजेरी लावतात आम्ही शेतकरी ईथे तक्रार देण्यास आलो असता लाईनमेन जोगदंडकर, भांजी हे दोघेच असतात आम्ही त्यांना तक्रार सांगितल्यावर साहेब नाहीत आम्ही काय करु हेच ऐकायला मिळते. सध्या शेतात मोठ- मोठे पैसे खर्च करुन पिके लावली आहेत पाच दिवसापासून पाणी नाही जनावरांचा सुध्दा बेहाल होत आहे म्हणून आज सर्व शेतकरी बांधव आम्ही एकत्र आलो आहोत, उद्या पर्यंत सचिन माने यांनी योग्य तो निर्णय नाही घेतले तर दुधनी वितरणाला जाळुन टाकु असे ईशारा संतप्त शेतकर्यांनी दिले.