विजयपूर शहरातील जुम्मा मस्जिद रोडवरील मेहतर
महलचे विजेच्या गडगडाटात थोडे पडझड होऊन एक कार आणि दोन दुचाकींचे नुकसान
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरातील मेहतर महालासमोरील मिनारला वीज पडून नुकसान झाले आहे.
सायंकाळी वारा, गडगडाट आणि विजांचा कडकडाट. यावेळी मेहतर महालाच्या एका मिनारच्या शिखरावर वीज पडली आणि त्या भागाचे दगड खाली पडले. त्यामुळे स्मारकासमोर उभ्या असलेल्या एक कार आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
उत्तर दिशेला असलेल्या या स्मारकाच्या उजव्या बाजूला असलेल्या मिनारच्या वरच्या भागाला वीज पडून नुकसान झाले.
आदिल शाहीच्या कारकिर्दीत, अली आदिल शाही द्वितीयने १७ व्या शतकात हे स्मारक बांधले आहे.