दुधनी जि प शाळेत पोमू राठोड यांच्या पतसंस्थेत बिन विरोध निवड झाल्याने सत्कार
अक्कलकोट (प्रतिनिधी)दि-२
अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी पोमू राठोड
यांच्या निवड झाल्याने दुधनी जिल्हा परिषद केंद्र शाळेत केंद्र प्रमुख सुरेश शटगार व रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आली आहे.
दुधनी येथील जि प प्रा केंद्र शाळेच्या कन्नड मुले,उर्दु शाळा,मराठी व कन्नड मुली असे चारही शाळेच्या वतिने भव्य दिव्य असे सत्कार समारंभ आयोजित केली होती.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काजीकणमस व दुधनी केंद्राचे केंद्र प्रमुख सुरेश शटगार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष तथा मराठी केंद्र शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ सैदप्पा झळकी व ज्येष्ठ समाज सेवक बाबा टक्कळकी हे उपस्थित होते.याप्रसंगी केंद्रप्रमुख सुरेश शटगार,रिपाइंचे सैदप्पा झळकी,मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीसैल मलगाण,कन्नड शाळेचे महांतेश कर सर,उर्दु शाळेचे सिध्दाराम चौधरी यांचे पोमु राठोड यांच्या अभिनंदन पर समयोचित भाषणे झाली.यासत्कार सोहळ्यात सुरेश शटगार, सैदप्पा झळकी, केंद्रीय मुख्यापक श्रीसैल मलगाण, शिवचलप्पा बाबासर, शिध्दाराम चौधरी,संतोष जोगदे, उड्डा सर,कोरबु सर,स्वामीनाथ महामुनी,भिमनगर शाळेचे मुख्याध्यापक मल्लीनाथ कांबळे,श्रीसैल धोडमनी,फय्याज सुतार, अंधारात उजनी,बाबा टक्कळकी,महांतेश कर,रविकुमार कोरचगाव,सिध्दाराम गोरे,सुभाष अतनूर,गुरय्या सलगर,सिध्दु राठोड, महिबूबसो बागवान,भारत रठोड,बसवराज मंत्री,तसेच सर्व सह शिक्षकी आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन सहशिक्षक संतोष जोगदे यांनी तर आभार कर सर यांनी केली आहे.
पतसंस्था स्थापनेपासून आजपर्यंत दुधनी भागातील तील कोणत्याही शिक्षकाला संचालक पद किंवा व्हाईस चेअरमन पदी मिळाले नव्हते प्रथमच पोमू राठोड यांना हा पद मिळाल्यांने या परिसरातील शिक्षक वर्गात व सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.