अनुभवी विद्यमान खासदार गद्धेगौड विरुद्ध नवख्या संयुक्ता पाटील यांच्यात लढत
विजयपुर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
बागलकोट लोकसभा मतदारसंघातून सiतत चार निवडणुकीत विजय मिळविलेले भाजपचे विद्यमान खासदार पी.सी.गद्धेगौडर हे पाचव्यांदा विजय मिळवून इतिहास निर्माण करण्यासाठी निवडणूकेच्या रिंगणात उतरले असून त्यांचा विरुद्ध काॅंग्रेस पक्षाच्या वतीने नवख्या संयुक्ता शिवानंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुभवी पी.सी. गद्धेगौडर व नवख्या संयुक्ता पाटील यांच्यात लढत होणार आहे.
तीस वर्षीय संयुक्ता शिवानंद पाटील ह्या विजयपूर जिल्ह्यातील मुत्सद्दी राजकारणी मंत्री शिवानंद पाटील यांच्या सुपुत्री,, सध्या त्या विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्या असून, राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्या पहिलीच सार्वत्रिक निवडणूक लढवित आहेत ती ही लोकसभेची ! हे विशेष
जर का संयुक्ता पाटील विजयी झाल्यातर बागलकोट लोकसभा मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार म्हणून मान मिळणार
73 वर्षीय पी सी गद्धेगौडर यांना 40 वर्षांचा राजकीय अनुभव असून, तर 30 वर्षीय संयुक्ता पाटील यांची ही पहिलीच निवडणूक, भाजप सतत पाचव्यांदा विजय मिळविणार की 20 वर्षांनंतर काॅंग्रेस पक्ष विजय संपादन करणार हे पाहावे लागेल.
राज्यातील भाजपचे प्रत्येक उमेदवार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठीच मते मागत आहेत. बागलकोट लोकसभा मतदारसंघातून सतत चार वेळा पी.सी. गद्धेगौडर जरी विजयी झालेले असले तरी अपेक्षेप्रमाणे विकास कामे झालेली नाहीत फक्त हिंदुत्व व मोदींची लाट यावर भाजपचे उमेदवार पी.सी. गद्धेगौडर विजयी झाले तर आश्चर्य वाटू नये!
तर काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार संयुक्ता शिवानंद पाटील ह्या नवख्या जरी असल्यातरी लोकसभा मतदारसंघात पाच आमदार हे काॅंग्रेस पक्षाचे आहेत त्यांचा पाठिंबा तर मिळणारच त्याचबरोबर वडील शिवानंद पाटील हे मंत्री पदावर आहेत. राज्यातील काॅंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाच गॅरंटी योजनांच्या लाभ मिळण्याची शक्यता दिसून येत आहे विशेष करून महिलांना बस प्रवास मोफत, महिलांना 2000/- मासिक वेतन या अंमलात असलेल्या गॅरंटी योजनांच्या लाभ या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे महिला उमेदवार संयुक्ता पाटील ह्या लाभ मिळण्याच्या प्रयत्न करणार !
संयुक्ता पाटील ह्या बाहेरच्या विजयपूर जिल्ह्यातील असल्यामुळे काॅंग्रेस पक्षात नाराजी असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व हुनगुंद विधानसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस पक्षाचे आमदार विजयानंद काश्यपन्नवर यांच्या पत्नी विणा काश्यपनवर यांना उमेदवारी देण्यात आली नाही याचा रागही नेते, कार्यकर्त्यांमध्ये आहे. विणा काश्यपनवर यांची नाराजी काॅंग्रेस पक्षातील गटबाजी, काश्यपनवर समर्थकांचा राग, या सर्वाला संयुक्ता पाटील यांना तोंड द्यावे लागणार आहे.
बागलकोट लोकसभा मतदारसंघात वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य, भाजपचे उमेदवार पी.सी. गद्धेगौडर हे लिंगायत गाणगा समाजाचे तर काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार संयुक्ता पाटील ह्या पंचमसाली समाजाच्या, वीरशैव लिंगायत समाजा नंतर दलित, कुरुब, अल्पसंख्याक व क्षत्रिय समाजाचे मतदार असून त्यांच्या वर निकाल अवलंबून आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.