Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कर्नाटकातील महिलांच्या खातात वर्षाला रु १ लाख २४ हजार जमा करणार - राहुल गांधी

Responsive Ad Here



कर्नाटकातील महिलांच्या खातात  वर्षाला रु १ लाख २४ हजार जमा करणार - राहुल गांधी 




विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

कर्नाटक विधानसभा निवडणुकेत काॅंग्रेस पक्षाच्या वतीने महिलांना महिना दोन हजार रुपयेसह देण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी झाल्यास राज्य दिवाळखोरी होईल असा आरोप भाजपा कडून करण्यात येत होते.   मात्र त्या पाचही योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या सुरू आहे.

 केंद्रात इंडिया गठबंधनचे सरकार अधिकारावर आल्यावर गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्यात येईल, त्यामुळे कर्नाटकातील महिलांच्या खातात वर्षाला १ लाख २४ हजार रुपये जमा होतील असे आश्वासन काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दिले.

  विजयपूर राखीव लोकसभा मतदारसंघातील काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार प्रा.राजू अलगूर यांचा प्रचारार्थ सोलापूर रोड वरील बीएलडीई संस्थेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

  देशात अवैज्ञानिक जीएसटी लागू झाला असून, कर्नाटत सरकारने जीएसटीच्या रूपात 100 रुपये दिले  तर  रु 13  केवळ केंद्र सरकार परत देत आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकवर अन्याय करत आहेत, हा अन्याय दूर करण्यासाठी जीएसटी मध्ये बदल करु, असे राहुल गांधी यांनी सांगितले 

भारताच्या इतिहासातील सध्याची निवडणूक ही काही सामान्य निवडणूक नाही, एक पक्ष, एक व्यक्ती हिंदुस्थानची राज्यघटना, लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, संविधानाने भारतीय नागरिकांना आवाज, सत्ता आणि आरक्षण मिळाले आहे,  संविधानाचे रक्षण हे आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.

एकीकडे नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत, त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी संविधान बदलण्यासाठी अनेक विधाने केली आहेत, 

मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 25 लोकांना अरब पती बनवले, अदानी सारख्या लोकांना लाभ करून दिला आहे देशातील सौर उर्जा, पवन उर्जा, विमानतळ इत्यादी प्रकल्प अदानी सारख्या उद्योगपतींना दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 

राज्यातील 1 कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ होत आहे, देशाचे भवितव्य सुरक्षित करण्याची जबाबदारी महिलांवर आहे, तर पुरुष 8 तास काम करतात, तीच महिला 16 तास काम करतात.  आज तरुण हात जोडून नोकऱ्यांसाठी भटकत आहेत, मात्र त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत., तरुणांना खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, सरकारी कार्यालये आणि सरकारी रुग्णालयांमध्ये शिकाऊ प्रशिक्षण देण्याची इंडिया गठबंधन मोठी महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगितले

ते म्हणाले की, नरेगा हमी वेतन प्रमाणे डिप्लोमा सारखा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना सरकारकडून 1 वर्षाची प्रशिक्षण  देऊन सक्षम केले जाईल, अशा प्रकारे कुशल आणि प्रशिक्षित असलेल्या करोडो तरुणांना तयार होतील 

 शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली नाहीत आणि शेतकऱ्यांचा पीकांना हमीभाव दिला जात नाही, परंतु इंडिया गठबंधनचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा आणि एमएसपीवर आधारित भाव देण्याचा निर्णय घेण्यात येईल 

आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करून नरेगाचे मानधन 400 रुपये करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी  व  राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांना मंत्री डॉ.एम.बी.पाटील आणि शिवानंद पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनुका हार घालून स्वागत करण्यात आले 

एआयसीसी राष्ट्रीय महासचिव तथा राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या जिल्हा प्रभारी मंत्री डॉ.एम.बी.  पाटील, साखर-कृषी उत्पादने पणन मंत्री शिवानंद पाटील, केपीसीसीच्या कार्याध्यक्षा विनय कुलकर्णी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी, आमदार यशवंतराय गौडा पाटील, सी.एस.  नाडगौडा, अशोक मनगोळी, विठ्ठल कटकदोंड विधान परिषद सदस्य सुनील गौडा पाटील, प्रकाश राठोड, नेते अब्दुल हमीद मुश्रीफ, माजी आमदार डॉ. मकबूल बागवान शरणप्पा सुनगार, कर्नाटक राज्य कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता नाईक , इतर उपस्थित होते.