Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

हॅटट्रिक हिरो भाजपाचे विद्यमान खासदार जिगजिणगी व काॅग्रेसचे अलगूर यांच्यात सरळ लढत

Responsive Ad Here



हॅटट्रिक हिरो भाजपाचे  विद्यमान खासदार जिगजिणगी व काॅग्रेसचे अलगूर यांच्यात सरळ लढत




 विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून सतत तीन वेळा विजयी झालेले भाजपचे विद्यमान खासदार रमेश जिगजिनगी हे चौथ्यांदा विजय मिळविण्यासाठी निवडणुकेचा मैदानात उतरले असून, तर काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक राजू अलगूर हे रमेश जिगजिनगी यांची विजयी घोडदौड रोखण्यासाठी तयारीला लागले आहेत.

  अनुचित जातीसाठी राखीव असलेल्या विजयपूर लोकसभा मतदारसंघातून अनुचित जातीच्या उजव्या व डाव्या समुदयाचा उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे. राजकारणात 50 वर्षे सक्रिय असलेल्या 12 निवडणूक लढवून 11 वेळा विजयी झालेले मुत्सद्दी राजकारणी रमेश जिगजिनगी पराभव करणे बोलण्याएवढे सरळ नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

भाजपचे उमेदवार रमेश जिगजिनगी यांना मोदीची गॅरंटी, तर काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार राजू अलगूर यांना राज्यात काॅंग्रेस पक्षाचे सरकारने दिलेल्या पाच गॅरंटी योजना हाताला सात देतील असा विश्वास आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा आमदार काॅंग्रेस पक्षाचे असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी झालेले दोन विधानपरिषदेचे सदस्य ही काॅंग्रेस पक्षाचे आहेत. तर  विजयपूर जिल्ह्यातील वजनदार राजकीय व्यक्तीमत्व असलेले डॉ.एम.बी.पाटील व मुत्सद्दी राजकारणी शिवानंद पाटील हे मंत्रीपदी आहेत या सर्वांचा जोरावर आपल्या विजय निश्चित असल्याचा विश्वास राजू अलगूर व्यक्त करीत आहेत.

   एकेकाळी काॅंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या विजयपूर लोकसभा मतदारसंघ विद्यमान भाजपचे शहर आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ यांनी 1999 साली झालेल्या निवडणुकीत कमळ फुलविले होते. 1999 व 2004 साली झालेल्या निवडणुकीत बसवनगौडा पाटील यतनाळ हे विजयी झाले होते. 

 2009 साली मतदार संघ पुनर्रचनेनंतर दलित उजव्या समाजाचे रमेश जिगजिनगी सतत तीन वेळा विजयी मिळविलेल्या आहे. तर मागील तीन निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाचे प्रकाश राठोड यांना उमेदवारी दिली होती ते तिन्ही निवडणूकेत पराभूत झाले होते. यावेळी मात्र काॅंग्रेस पक्षानं दलित समाजातील डाव्या समुदयाचे राजू अलगूर यांना निवडणूकेचा रिंगणात उतरविले आहे. त्याचा लाभ काॅंग्रेसला मिळेल का हे पाहावे लागेल. 

  विजयपूर राखीव लोकसभा मतदारसंघात लिंगायत, अल्पसंख्याक, दलित, कुरुब, बंजारा समाजाचे मतदारांची संख्या लक्षणीय आहे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची मते बहुतेक काॅंग्रेस पक्षास जातील. दलित समाजातील मतं यावेळी विभागली जाणार हे नक्की!  लिंगायत समाजातील पंचमसाली, घाणगा, बनजगा समाजाची मते भाजपाच्या पारड्यात पडण्याची शक्यता दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुळे व भाजपाचे ज्येष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा यांच्या नाराजी मुळं कुरुब समाजाचे मते काॅंग्रेस कडे जातील असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 बंजारा समाज या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यास वंचित झाला असल्यामुळे नाराज आहेत. बंजारा समाजाची मत विभागणी होईल, अधिक तर मतं काॅंग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय समाजाचे मते नेहमी प्रमाणे भाजपाला देतील. 

 मागील तीन निवडणूकेपेक्षा या निवडणुकेत भाजपा व काँग्रेस पक्षाचे दलित  डाव्या व उजव्या समाजातील उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर होणार एवढे मात्र नक्की!