श्रीमती सुनंदाताई महिंद्रकर यांचे निधन
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भारतीय जनता पार्टी विजयपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्या, विजयपूर नगरसभेच्या माजी सदस्य, भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या
श्रीमती सुनंदाताई महिंद्रकर ( वय 89 ) यांचे आज दि 30 एप्रिल 2024 मंगळवार रोजी सकाळी ठीक 6 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे
आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याप्रसंगी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, समाज बांधव उपस्थित होते.