दुधनी जि प मराठी केंद्र शाळेत चौथीच्या विध्यार्थ्यांना निरोप
अक्कलकोट दि.४-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेतील चौथीच्या विध्यार्थ्यांना निरोप देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी हे होते.प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन उपाध्यक्ष हणमंत कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आली.दीपप्रज्वलन रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सैदप्पा झळकी, अध्यक्ष कर बसप्पा अमाणे,नगरसेविका गंगावती मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली आहे. याप्रसंगी मराठी शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, सैदप्पा झळकी,सदस्य महेदीमिंया जिडगे,कन्नड मुले शाळेचे ज्येष्ठ मुख्याध्यापक श्री उड्डा ,मुली शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबा ,मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल मलगाण ,उर्दु शाळा मुख्याध्यापक उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केली आहे.
यावेळी लायन्स क्लब दुधनी चे अध्यक्ष तथा कन्नड शाळेचे शिक्षक संतोष जोगदे, सैदप्पा झळकी,मुख्याध्यापक श्रीशैल मलगाण,कोमल कारेकर व लहान चौथीचे विद्यार्थी प्राप्ती गंगावती,अर्पणा गद्दी,महानंदा जानकर, श्रेयश कामजी यांचे समयोचित भाषणे झाली.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, सैदप्पा झळकी,सदस्य महेंदिमिंया जिडगे आणी चारही शाळेचे मुख्याध्यापक,सह शिक्षक संतोष जोगदे ,रविकुमार कोरसगावकर श्री.बेण्णेसूर सह शिक्षिका महानंदा जाधव,ज्ञानेश्वरी कारेकर व धनश्री गीण्णी महानंदा जाधव तसेच सर्व विध्यार्थी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकुमार कोरचगांवकर तर आभारप्रदर्शन संजीवकुमार बेण्णेसूर यांनी केली आहे.