अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा हे हिंदु- मुस्लिमांचे तिर्थक्षेत्र की जुगार अड्डांचा बाजार...?
अक्कलकोट- तालुक्यातील हाजी ख्वाजा सैफुल मुल्क दर्गा हैद्रा येथील हिंदू- मुस्लिमांचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आजकाल हैद्रा म्हंटले की मटका, जुगार, अवैध धंदे- दारु साठी प्रसिद्ध होत आहे त्यामुळे भाविकांना ञास होत आहे.
हैद्रा बसस्थानकावर उतरताच शहरातील रिक्षावाले, मंदिरासमोरील नारळ फुल जसे विचारतात त्याच प्रमाणे हैद्रा येथे एसटी मधुन उतरताच क्लब..क्लब, दारु, मटका कुठे जायचे आहे असे अनेक प्रश्न विचारले जातात त्यामुळे दर्गा येथे येणारे भाविक ञस्त झाले आहेत.
तालुक्यातील मोठमोठे जुगार अड्डे बंद झाले आहेत माञ हैद्रा मध्ये राजरोसपणे चालु आहे याचे कारण दर्गा कमिटी की शासन हे लोकांनी विचार करत आहेत.