श्रीहर्षगौडा शिवशरण पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूरातील यूवा नेता श्रीहर्ष गौडा शिवशरण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. बेंगळुरू येथील भाजपा पक्ष कार्यालयात भाजपा राज्य अध्यक्ष बी वाया वियजेंद्र, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा , माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा व इतर पक्ष प्रमुखांचा उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे भाजप पक्षात प्रवेश केला.
विजयपूर जिल्ह्यातील पाटील घराण्यातील युवा नेते, जिल्ह्यातील राजकारणातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे शिवशरण पाटील यांचे सुपुत्र श्रीहर्ष गौडा पाटील यांच्या भाजपा मधील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
कारण श्रीहर्ष गौडा पाटील यांचे काका मुत्सद्दी राजकारणी शिवानंद पाटील हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर असून त्यांची सुपुत्री जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्या संयुक्ता पाटील ह्या बागलकोट लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर त्यांचे अजून एक काका विजूगौडा पाटील हे भाजपमध्ये सक्रिय आहेत .
सहकार क्षेत्रात संघटनेत सक्रिय सहभाग असलेले श्रीहर्षगौडा पाटील यांची २०१० मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी राज्यातील प्रतिष्ठित श्री सिद्धेश्वर-सहकारी बँकेत संचालक म्हणून निवड झाली. पुढे त्यांनी सलग 3 वेळा निवडून येऊन हॅट्ट्रिक साधली आणि 2017 ते 2020 पर्यंत त्याच बँकेचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम केले.
अखिल भारत वीरशैव महासभेच्या जिल्हा युवक युनिटचे अध्यक्ष, सहकार भारती कर्नाटक जिल्हा युनिटचे उपाध्यक्ष आणि जिल्हा सहकारी संघाचे संचालक म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून राष्ट्रसेवेत गुंतलेले. श्रीहर्ष गौडा यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे.