विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटकातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे - पंतप्रधान मोदी
बागलकोट -
शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या हुबळी धारवाड महाविद्यालयाच्या प्रांगणात भरदिवसा तरुणीची हत्या, बेंगळुरू हाॅटेल मध्ये बांम्ब स्फोट, स्वतःचा दुकानात हनुमान चालीसा लावणारावर हल्ला अशा अनेक घटना घडल्या आहेत, कर्नाटकातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भाजपने आयोजित केलेल्या निवडणूक प्रचार सभेत सहभागी होत त्यांनी राज्य काँग्रेस सरकारवर टीका केली
कर्नाटकची लूट करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी की नाही, असा सवाल करत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेल्या बंगळुरूमध्ये पाण्याची टंचाई असताना टँकर माफिया धंदा सुरू असून, तेथे कमिशनचा धंदाही सुरू असल्याची त्यांनी सांगितले.
हुबळी येथील नेहाच्या हत्येचे प्रकरण त्यांनी उपस्थित करत राज्य काँग्रेस सरकार व्होट बँकेचे राजकारण करत असल्याचे सांगितले. हनुमान चालीस पाठ करणाऱ्यांवर हल्ले होत असताना काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप यांनी केला.
काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे एससी आणि एसटी समाज सुरक्षित नाही. त्यांनी एससी आणि एसटी आरक्षण बदलण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने मुस्लिमांना जे आरक्षण दिले जात आहे ते ओबीसींना द्यायला हवे. आंबेडकरांच्या राज्यघटनेत अनुसूचित जाती-जमातींना दिलेले अधिकार व्होट बँकेच्या राजकारणासाठी लुटले जात आहेत. एससी, एसटी, ओबीसी समाजाचे आरक्षण लुटून ते अल्पसंख्याकांना द्यायचे हे काँग्रेसचे काम आहे. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत काँग्रेसचे ते शक्य होणार नाही असे सांगितले
बागलकोट आणि विजयपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी खूप काम केलं आहे. रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांनी चांगले काम केले आहे. यामुळे अहोळ्ळी, पट्टदकल्ल आणि बदामी पर्यटन स्थळांचा विकास करणे शक्य झाले आहे. त्यासाठी पी.सी.गड्डीगौडर आणि रमेश जिगजीनगी यांना लाखो मतांच्या फरकाने विजयी करावे, असे आवाहन विनंती त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, खासदार पीसी गड्डीगौडार, रमेश जिगजीनगी, राज्यसभा सदस्य नारायणसा भांडगे, आमदार बसवनगौडा गौडा पाटील यतनाळ, विधान परिषद सदस्य पीएच पुजारी, माजी मंत्री सी.सी. पाटील, गोविंद कारजोळ, संगन्ना बेलोब्बी, या सभेच्या व्यासपीठावर आमदार सिद्दू सवदी, जगदीश गुडगुंटी, माजी आमदार वीरण्णा चरतीमठ, राजशेखर शिलवंत, दोडना गौडा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शांतगौडा पाटील, आर.एस.पाटील कुचबाळ, इतर उपस्थित होते.