सांगवी बु येथे वादळी वाऱ्यासह पाऊस; घरावरील पत्रे उडाली, अक्कलकोट तालुक्यात पावसाची हजेरी
सांगवी बु येथे एक महिला गंभीर जखमी
अक्कलकोट / क्राईम रिपोर्टर- प्रविणकुमार बाबर
तालुक्यातील सांगवी बु येथे पावसामुळे गुरुवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. दरम्यान, सांगवी बु गावात वादळी वाऱ्याने शेतातील वास्त्यावरचे पत्रे उडून गेले असून, काही ठिकाणी झाडे उनमळून पडली आहेत. तर काहींच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळी झालेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असून, या वादळी वाऱ्यात अक्कलकोट वागदरी रोड लगत दादाराव भोसले यांच्या शेतातील व्यवसयिक पान टपरी असून, या वादळी वाऱ्यात टपरी दोन ते तीन वेळा उलटून पडली दरम्यान या टपरीत बसलेल्या महिला निर्मला सुरेश भोसले वय -43 या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. गावातील काही जणांच्या घरावरील पत्रे सुमारे शंभर फूट अंतरावर जाऊन पडली.
वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याचे समजताच तलाठी कोतवाल, गावात जाऊन तात्पुरते नुकसानीचा पंचनामा करत आहेत. या वादळी वाऱ्याने विजेच्या तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा सायंकाळी पासून खंडित असल्याने नागरिक उकड्याने त्रस्त असून, शिवाय विशेष गंभीर बाब म्हणजे अंधारात संसार उपयोगी साहित्य, पत्रे, अन्य वस्तू कुठे उडून गेली आहेत अंधारमुळे शोधणे जिकरीचे ठरत आहे. विजेचे काम तात्काळ पूर्ण करून वीज सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.
शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी गावाकऱ्यातून होत आहे.