सहकार भारती जिल्हा अध्यक्षपदी श्रीहर्षगौडा पाटील, मुख्य सचिवपदी परशुराम चिंचली यांची निवड
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
सहकार भारतीचे राज्य अध्यक्ष व माजी आमदार राजशेखर शिलवंत यांच्या उपस्थितीत झालेल्या विजयपूर जिल्हा सहकारी भारती कार्यकारिणीची सभेत सहकार भारती विजयपूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीहर्षगौडा शिवशरण पाटील व मुख्य सचिवपदी परशुराम चिंचली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष डॉ आर.आर. नाईक यांनी भूषविले होते तर व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाचे सदस्य गुरुशांत निडोणी, सहकार रत्न पुरस्कृत श्रीमंत इंडी, राज्य संघटना सचिव बी.आर. मजुंनाथ उपस्थित होते
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विभागीय सचिव सुभाष इंडी यांनी केले तर शेवटी जिल्हा संघटना सचिव दिपक शिंत्रे यांनी आभार मानले.