दुधनी भीमनगर पाच दिवसापासून अंधारात
अक्कलकोट प्रतिनिधी- निंगप्पा निंबाळ
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी (ग़्रामीण) भीमनगर या भागात पाच दिवसापासून पूर्वी अवकाळी वार्ता पावसामुळे खांब पडून वीज गेल्याने येथील नागरीक पाच दिवसापासून अंधारात जिवन जगत आहे. लवकरात लवकर विज कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी रिपाइं आठवले गट चे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे.
या भागात मोठ्या परवा वादळ व पावसाने विजेचे तीन खांब पडली आहे. संबंधित अधिकार्यांने जातीने लक्ष घालून विज पुरवठा सुरळीत करावे. अशी मागणी सैदप्पा झळकी यांनी केली आहे.